Birthday Wishes for the True Living Legend: The Original Little Master “सुनील गावसकर”…

Birthday Wishes for the True Living Legend: The Original Little Master Sunil Gavaskar…

सुनील गावसकरांच्या वयाची साठ वर्षे पूर्ण करण्याच्या बातम्या झळकल्या आणि आश्चर्य वाटलेच. अजून ही आपल्यासाठी तो लिटिल मास्टर सुनील च आहे असं वाटतं. SMG.jpg

By All means, he was the Master and Best Batsman of his time and that too, for a very very long time.

Before Sachin Tendulkar took over; Sunil Gavaskar along with Kapil Dev was the name to be taken with aura in Indian Sports world on truly international level.

त्यांचे रेकॉर्डस, इतर माहिती आणि तपशील तर चर्चिले जातीलच. पण खऱ्या अर्थाने सचिनच्या पिढीच्या आमच्यासारख्या क्रिकेट भक्तांनाही सुनील गावसकर या नावातली The Last Word in technically perfect Batting ही खूणगाठ जाणवते.

मला खूप जुना १९८६ च्या आसपास चा एक सामना आठवतो जो मी आमच्या सांगलीला शेजाऱ्यांच्या घरी जाऊन पाहिला होता. सुनील गावसकरांनी त्यात मनमुराद फलंदाजी केली होती. विशेष म्हणजे तो एकदिवसीय सामना होता.

आणि पहाटे पहाटे सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाबरोबरच्या कसोटी आणि त्यातील सुनील टच फलंदाजी हा सुद्धा एक अनमोल ठेवा. (त्यावेळी बोर्डर, क्रेग मॅथ्यूज,डीन जोन्स आणि भरभक्कम डेविड बून असे खेळाडू ऑसीजची खडूसगिरीची परंपरा चालवत असत..)

अलीकडच्या काळात गावसकरांचं नाव क्रिकेट समालोचनाशी जोडलं गेलं आहे. त्यातील त्यांचे आणि जेफ़ बॉयकॉट चे मुद्दे प्रतिमुद्दे हे हर्ष भोगलेच्या साथीने रंगतात. आणि शौकिनांना अजूनच गुंगून जायला होतं.

विशेषत: वर्तमानाचा संदर्भ न सोडता जेव्हा गावसकर त्यांच्या काळातील उदाहरण देऊन एखादा मुद्दा सांगतात तेव्हा आपण खरेच लिव्हिंग लेजंड ला ऐकतो आहोत हे जाणवते.

क्रिकेट व्यवस्थापनातील त्यांचे काही पदभार गाजले आणि वादग्रस्त ही झाले आहेत. त्यांचे आंतरराष्ट्रीय व्यस्त वेळापत्रक, त्यांची स्वच्छ, शिस्तबध्द व पूर्ण व्यावसायिक जीवनपध्दती, काही बाबतीतील त्यांची मते, इ वरून ते वादग्रस्त ही ठरले आहेत.

पण अर्थात मैदानाबाहेरील हे सर्व मैदानातील कामगिरीला एक टक्क्यानेही झाकोळू शकत नाही..

सुनील गावसकरांना षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त या छॊट्या फॅन कडून अनेकानेक शुभेच्छा..!

सुनील गावसकर यांच्या बाबतीत मला आठवणाऱ्या १२ गोष्टी:


१. त्यांची वन डे मध्ये फक्त एक च सेंचुरी आहे.

२. १९८३ चा वर्ल्ड कप जिंकलेल्या चित्रफितीतील लॉर्डस च्या गॅलरीतील अत्यानंदित त्यांचा चेहरा विसरणे कठीण आहे.

३. अनेकदा ते स्लिप मध्ये शून्यावर बाद होत. त्याबाबत त्यांनी सांगितले होते की गुणवान फलंदाज स्विंग होणाऱ्या चेंडूवर बॅटने जवळ तरी पोहोचतो, म्हणून त्याचा झेल जातो. इतरांना बॅट लावणे ही जमत नाही :)

४. लेग ग्लान्स हा फटका भारताचे क्रिकेट भीष्माचार्य रणजीतसिंहजी यांनी शोधला असे म्हणतात. या गोष्टीचा उल्लेख गावसकर समालोचनामध्ये नेहमी करतात.

५. गावसकरांनी कधीही हेल्मेट वापरले नाही. वेस्ट इंडिजच्या तोफखान्याला ही त्यांनी एक फक्त स्कल गार्ड घालून आरामात तोंड दिले. (अद्भुत!)

६. फलंदाजाची पहिली रन महत्वाची असते. कितीही महान फलंदाज असला तरी त्याला पहिली रन घेऊन दुसर्या बाजूस गेले की हायसे वाटते. या गोष्टीचा उल्लेख गावसकर समालोचनामध्ये नेहमी करतात.

७. गावसकरांच्या मुंबई क्रिकेट असो च्या लॉकर मध्ये मध्यंतरी खूप परकीय चलन सापडले होते, व असे इतरही काही लोकांच्या बाबतीत झाले होते. सदर प्रकरण आजतागायत धूसर च आहे.

८. गावसकरांचे क्रिकेट कर्तुत्वाचे प्रमुख पैलू म्हणजे १९७१ चा अफलातून विंडीज दौरा, सलग १७ वर्षे सलामीला फलंदाजी, दहा हजार धावा, अनेक वर्षे सर्वाधिक शतके, अप्रतिम तंत्रशुध्दता, व्यावसायिक वागणूक, आणि कपिल देव च्या बरोबरीने कप्तानीसह भारतीय क्रिकेट चा अनेक वर्षे वाहिलेला भार.

९. मेलबर्न कसोटीत चुकीच्या पध्दतीने बाद दिल्यावर मैदान सोडण्याची चूक त्यांच्याकडून घडली होती. आणि “मोठ्या लोकांची एक चूक ही पुरेशी” या नात्याने इंग्लिश व ऑसीज ना बोलायला एक कायमचे हत्यार दिले गेले.

१०. सनी डेज हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिध्द आहे. शालेय पुस्तकामध्ये त्यातील एक धडा आम्हाला होता. त्यात दात दुखीने त्रस्त असतानाही त्यांनी केलेल्या फलंदाजीचे वर्णन त्यात होते. जसजशी वेदना वाढत गेली तसे नकळत माझे मन खंबीर होत गेले व एकाग्रता वाढली असे त्यांनी नमूद केले होते. तो भाग अनेक वर्षे मला प्रेरणादायी वाटत असे.

११. त्यांनी एका मराठी चित्रपटात – सावली प्रेमाची मध्ये काम केले होते. आणि संदीप पाटील बरोबर या ही मुशाफिरीची चर्चाच खूप झाल्याचं माझे वडील सांगायचे.

१२. कपिल देव आणि सुनील ही भारतीय क्रिकेट ची शक्तीपीठे होती आणि त्यांच्यातील शीतयुध्द ही रंगलेले होते. षटकार आणि चौकार या आता जणू दंतकथा वाटणाऱ्या त्यावेळच्या प्रसिध्द मासिकांमध्ये याबद्दल सुरस कथा छापून येत व आम्ही त्या चवीने वाचत असू.

आणि शेवटी -
गावसकर हे त्यांच्या वागण्यातून आपण महाराष्ट्रीय असे आवर्जून नेहमी दाखवून देत नसले तरी आजचा तारा – सचिन आणि कालचा ध्रुव – सुनील हे दोघेही मराठी असल्याबाबत मराठीजनांना का आनंद वाटणार नाही?

पुन्हा एकदा या व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा!

2 Selective links from the web:

A. For an Excellant Interview of the current Hero – Sachin Tendulkar on 60th Birthday of this earlier Generation Legand – Sunil Gavaskar

Please Click:

http://www.gulfnews.com/sport/Cricket/10330044.html

B. For the Interview of Sunny himself on his 60th Birthday

Please Click:

http://www.mid-day.com/news/2009/jul/090709-Sunil-Gavaskar-Dilip-Sardesai-Memorial-Cricket-Lecture-Little-Master-Birthday-boy.htm

[In response to this Mid-day article, one fan from the West Indies has written -

"As a West Indian, I can never forget Gavaskar's rule in the 1971 series. The calypsonians sang of him...
GAVASKAR LIKE A WALL!
WEST INDIEES COULD NOT GET GAVASKAR OUT AT ALL! " !]

This sums up it all..


Technorati : , ,

तुमचा अभिप्राय नोंदवा