अव्यक्त.

—————-

काही वर्तुळे
शेवट न घेता
राहतात तशीच
अनंत
.

काही प्रश्न
उकल न सांगता
राहतात तसेच
निरुत्तर
.

काही प्रवासी
ओळख न देता
राहतात तसेच
विरक्त
.

काही चिमण्या
अंगणात न येता
राहतात तशाच
दूरस्थ
.

काही कविता
सारे न सांगता
राहतात थोड्या
अव्यक्त

अव्यक्तच…

—————

One Response to “अव्यक्त.”

  1. Asha Joglekar Says:

    सुंदर .
    कांही कविता अव्यक्त राहूनही सांगून जातात खूप कांही.


तुमचा अभिप्राय नोंदवा