संतसाहित्यातील एक महत्वाचा ग्रंथ- समर्थ रामदास रचित श्री दासबोध – यातील एका रंजक विषयावर हा लेख आहे.
दासबोधाबाबत ऐकले नसेल असा मराठी माणूस नसेल. संसारी मनुष्याला उत्तम उपदेश, रसाळ व सोपी भाषा, उत्कृष्ट उपमा व दृष्टांत इ. दासबोध ग्रंथाची साहजिक गुणवैशिष्ट्ये आहेत.
कितीतरी वेळा यातील अनेक उत्तमोत्तम वचने ही मराठीत संदर्भ व म्हणी म्हणून वापरली जातात.
अनेक जाणकारांनी दासबोधाचे विवेचन केले आहे. ज्येष्ठ व अभ्यासू वाचकांच्या वाचनात नव्हे पठणात हा ग्रंथ असेलच.
माझ्याबाबतीत बोलायचे तर लहानपणापासून या संदर्भातील – “आधी वंदू कवीश्वर” हे वचन, मूर्खनाम लक्षणे,इ गोष्टी संदर्भ म्हणून ऐकलेली होतीच.
परंतु सध्याच्या अतितांत्रिक (व अतिहुशार!) पिढीचा भाग असल्याने (कितीही छान वाटत असले तरी) लाकडी स्टँडवर ग्रंथ ठेवून वाचन करण्याचा वेळ व भाग्य आजपावेतो स्वत:ला आणू दिले नव्हते.
परंतु काही दिवसांपूर्वी अचानक दासबोधाची PDF मधील एपीएस मराठी सॉफ्टवेअर वापरून केलेली समग्र फ़ाईल इंटरनेट वरच मिळाली आणि अत्यानंद झाला.
बाकीच्या टिपिकल rich Dad poor Dad आणि My life- Bill Clinton अशा इ-बुक्स च्या फ़ोल्डर मध्ये ही एक मराठमोळी भर पडली.
आणि मग वाचन सुरु झाले.
आज त्यातील एक भाग आपणासाठी उध्दृत करत आहे.
मनुष्य जन्म नरदेहा व त्याच्या अभिमानाच्या फोलपणा संबंधी हा भाग आहे.
आणि मुख्य म्हणजे माझ्या आईच्याच तोंडून “उंदीर म्हणती घर माझे, झुरळे म्हणती माझे घर” या अशाच काहीवेळी ऐकलेल्या उद्गारांचा संदर्भ इथे आहे…
मनुष्यजन्म किती उत्तम व इतर पशूं पेक्षा श्रेष्ठ आहे हे समर्थ आधी सांगतात. हा जन्म म्हणूनच वाया घालवू नका. आपणास मिळालेले हे निरोगी व अपंगत्वविरहीत शरीर हे भाग्य आहे, असे ते म्हणतात. परंतु काही लोक वृथा याचा अभिमान बाळगतात आणि गर्व धरतात. हे किती चूक आहे हे सांगताना समर्थांनी रसाळ स्पष्टीकरण केले आहे. ते पुढे म्हणतात की शरीराचे काहीही होऊ शकते. किती प्रकारांनी त्यावर घाला पडू शकतो. जनावरे लचके तोडतील, अग्नी जाळेल इ. (सद्य स्थितीत हा दृष्टांत आपण अपघात भय या पध्दतीने घेऊ शकतो. अनेक मुजोर आयुष्य जगणारे लोक एका फटकन होणाऱ्या अपघातानंतर जमिनीवर आलेले आपण पाहिले आहेत)
तसेच पुढे समर्थ सांगतात की जसा शरीराचा तसा लोक घरांचाही अभिमान बाळगतात. (मृत्तिका खणोन घर केले…) माझे घर, माझे घर म्हणतात. पण ते तुमचे कुठे आहे? तिथे उंदीर राहतात, झुरळे, डास, माशा, राहतात, इतर प्राणी राहतात. आणि मग तुम्ही रोगभ्रष्ट होऊन गाव सोडून गेलात तर ते घर त्यांचेच होऊन जाते. तुमचे कुठे?
म्हणूनच “देह परमार्थी लाविले, तर त्याचे सार्थक झाले; नाहितरी हे वेर्थची गेले, नाना आघाते मृत्यूपंथे…असे ते शेवटी म्हणतात.
जन्म दो दिसांची स्थिती सारखी चिरपरिचित म्हण तर म्हणूनच इथे आपल्याला मुळातून सापडते.
अशा बिनतोड युक्तिवाद आणि समर्पक उदाहरणांमुळे आपले अर्थातच उरले सुरले मीपण ही गळतेच. आणि अक्षरश: आपण जमिनीवर येतो.
समर्थांच्या लेखनाची वैशिश्ट्य असलेली ’दीर्घ व विस्तृत उदाहरणांची भाषा” ही इथे दिसतेच. या लेखनात थोड्या वैचित्र्य शब्दयोजना व अतिशय तपशीलाचे वर्णन असते. तरीही यामुळेच सर्वसामान्यांना तो विषय थेट समजून घेणे सोपे जाते व मुख्य म्हणजे हे वाचन रसपूर्ण होते हे लक्षात घेतले पाहिजे.
वाचकांसाठी वरील संदर्भाचे उतारे जसे तसे देत आहे. जरूर वाचावे:
समजेल, “उमजेल” व आनंदही मिळेल.
श्री दासबोध –
“स्तवन नाम दशक – नरदेह स्तवन निरुपण समास”
जुलै 4, 2009 at 4:23 pm
Dear Yogesh,
I have read Marathi Dasbodh. I like Aatmaaram also. Please let us know wherefrom the PDF ebook can be downloaded?
My mothertongue is Marathi, I have Translated Sri Nisargadatta Maharaj’s “I Am That”, into Hind. Publishers Chetana, Mumbai, 2001.
I have also translated a Few books of Vsedant, Sri Ramana Maharshi’s and Sri J.Krishnamurti’s Literatue, into Hindi.
I think there is a lot for me in your post.
Thanks, Regards.